‘ते’ विधान भोवलं, अबू आझमी यांच्याविरोधात मोठी कारवाई

Abu Azmi Suspended Over Aurangzeb Remarks

Abu Azmi | समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांना महाराष्ट्र विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. औरंगजेब (Aurangzeb) संदर्भातील वादग्रस्त विधानामुळे मागील दोन दिवसांपासून सभागृहात गोंधळ सुरू होता. अखेर, मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि सभागृहात एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.

आझमींच्या विधानावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने

आझमी यांनी औरंगजेबाच्या राजवटीला “सुवर्णकाळ” म्हणत गोडवे गायल्याचा आरोप करण्यात आला. त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवला. “अबू आझमींना या सभागृहात बसण्याचा कोणताही अधिकार नाही,” असे शिंदे यांनी ठणकावून सांगितले.

यावरून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर, आवाजी मतदान घेत एकमताने आझमींचे निलंबन जाहीर करण्यात आले. आता ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत, तसेच त्यांना विधानभवनाच्या आवारात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

आझमींचा यूटर्न – विधान मागे घेत स्पष्टीकरण

विवाद वाढल्यानंतर मंगळवारी अबू आझमींनी (Abu Azmi) आपल्या एक्स (Twitter) अकाऊंटवर स्पष्टीकरण दिले होते. “माझ्या शब्दांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले. मी इतिहासकार आणि लेखकांनी जे म्हटले आहे, तेच सांगितले. माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावले गेले असेल, तर मी शब्द मागे घेतो,” असे त्यांनी म्हटले होते.

मात्र, त्यांच्या या स्पष्टीकरणाने वाद शमला नाही. विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी आझमींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि अखेर त्यांचे निलंबन करण्यात आले.

 Title : Abu Azmi Suspended Over Aurangzeb Remarks

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .