महाराष्ट्र मुंबई

गायीची जशी पूजा केली जाते तशी शेतकऱ्याची पूजा करा- अबू आझमी

मुंबई | गायीची जशी पूजा केली जाते, तशी शेतकऱ्याची पूजा करायला हवी. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायलाच हवेत, असं समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

नव्या कृषी कायद्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी किसान मोर्चा धडकला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी मुंबईत दाखल झाले आहेत. अबू आझमी यांनीही शेतकरी मोर्चाला पाठिंबा देत कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी अबू आझमी बोलत होते.

शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या जाचाला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, असं अबू आझमी म्हणाले.

केंद्र सरकार शेतकऱ्यांना संपवण्याचं काम करत आहे, अशी टीकाही अबू आझमी यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

थोडक्यात बातम्या-

नवी मुंबईत गणेश नाईकांना आणखी एक मोठा धक्का!

“कुणाला किती मुलं होती, कुणाचं लग्न झालं, मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केलीय हे सांगू का?”

“केंद्र सरकारने तयार केलेले कृषी कायदे रद्द होणार नाहीत”

मोदींनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले, आंदोलनात राजकारण येऊ नये- पंकजा मुंडे

“राज्य सरकारातला एक मंत्री जिरवायची भाषा करतो हे योग्य नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या