महाराष्ट्र मुंबई

“कोण राज ठाकरे? आता राज ठाकरेंचं कोणतंही स्थान नाही”

मुंबई | राज ठाकरे कोण आहेत? मनसेचा अवघा एक आमदार आहे. राज ठाकरेंना मीडियाने मोठं केलं आहे, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज ठाकरेंनी सुधारीत नागरिकत्व कायद्याला समर्थन केल्याने अबू आझमी यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडंलं आहे. तसेच राज ठाकरेंना मीडियाने एवढं मोठं केलं आहे, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

मला बदबू आझमी म्हणणारे राज ठाकरे त्रस्त आहेत. त्यांचे आमदारच निवडून येत नाहीत. ना आमदार, ना नगरसेवक. थकलेल्या, हरलेल्या राज ठाकरेंना कुणीच जवळ न केल्याने ते भाजपसोबत जात आहेत, असं आबू आझमी म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना तीस वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांना भाजपने धोका दिला आहे. आता शिवसेना केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये वाढणार आहे, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“इतके दिवस तुमच्या कानांना मशिदीवरील भोंग्यांचा त्रास झाला नाही का?”

सर्वोच्च न्यायालयात काय झालं? देवेंद्र फडणवीसांना दिलासा मिळाला का???

महत्वाच्या बातम्या- 

शरद पवारांची सुरक्षा काढणं सुडबुद्धीनं घेतलेला निर्णय- रोहित पवार

“बाळासाहेबांचे विचार आणि वारसा राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात”

“इतके दिवस तुमच्या कानांना मशिदीवरील भोंग्यांचा त्रास झाला नाही का?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या