मुंबई | मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे 7 मार्चला आयोध्येला जाणार आहेत. मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन. ते राम मंदिर बांधतील आणि आपण बाबरी मशीद बांधू, असं वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांचे सुपुत्र फरहान आझमी यांनी केलं होतं. मात्र अबू आझमी यांनी त्यांच्या मुलाच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.
फरहान आझमी माझा मुलगा असला तरी त्याचा आणि समाजवादी पक्षाचा काहीही संबंध नाही. मी त्यांने केलेल्या बाबरी मशिदीबाबतच्या वक्तव्याचा निषेध करतो, असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.
मी इशारा देतो, याला धमकी समजा किंवा काहीही समजा पण मला विनम्रपणे सांगायचंय की उद्धव ठाकरे 7 मार्चला आयोध्येला जाणार असतील तर मी सुद्धा त्यांच्यासोबत जाणार. तसेच माझ्या वडिलांना सोबत येण्याची विनंती करणार आहे, असं फरहान आझमी यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, ठाकरे सरकार 6 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त चालणार नाही, अशी टीका फरहान आझमी यांनी केली होती.
ट्रेंडिंग बातम्या-
कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले चहा
मुस्लिमांशी खेळाल तर मोदींना पुन्हा चहा विकावा लागेल- इम्तियाज जलील
महत्वाच्या बातम्या-
सीएए हा काळा कायदा म्हणून इतिहास नोंद करेल- उर्मिला मातोंडकर
मुबारक हो टुकडे टुकडे भाजप– अनुराग कश्यप
कलह पसरवणाऱ्यांना समाजच सरळ करेल- मोहन भागवत
Comments are closed.