महाराष्ट्र मुंबई

‘अबू आझमींचं दिल्लीतील हिंसाचाराशी कनेक्शन’; ‘या’ भाजप नेत्याचा गंभीर आरोप

मुंबई | अबू आझमींनी चिथावणीखोर भाषणं केली असून, त्या मागचा बोलवता धनी कोण हे शोधा, असं आवाहन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केलंय.

अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एक पत्र लिहिलं आहे. दिल्लीतील हिंसाचाराचं कनेक्शन हे आझाद मैदातील भाषणांशी आहे का, याची चौकशी करा, असं अतुल भातखळकर यांनी पत्रात म्हटलंय.

घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे, अशी वक्तव्य आझमीनी केल्याचंही अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनाच्या या मंचावरून अबू आझमींनी फक्त इतरांना भडकावण्याचं काम केलं होतं. अबू आझमींनी केलेल्या भडकाऊ भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी 26 जानेवारी 2021ला दिल्लीत शेतकरी आंदोलनाच्या आडून गोंधळ घालणं आणि लाल किल्ल्यावर झेंडा फटकावण्यासारख्या देशविरोधी कृत्ये केली. त्यामुळे अबू आझमींची चौकशी करणं आवश्यक आहे, असं अतुल भातखळकर म्हणालेत.

 

थोडक्यात बातम्या-

“दिल्लीच्या हिंसाचारामागे केंद्र सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही”

‘सीमावादावर ‘हे’ शेवटचं हत्यार’; शरद पवारांची रोखठोक भूमिका

दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले

“रोज वचवच करणारे संजय राऊत कालच्या घटनेवर काही बोलले नाहीत”

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या