काशी विद्यापीठात अभाविपचा पराभव, भाजपला हादरा

उत्तर प्रदेश | काशी विद्यापीठात झालेल्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) पराभव झालाय. नगरपालिका निवडणुकीपू्र्वीच अभाविपचा पराभव झाल्यानं भाजपला मोठा हादरा असल्याचं मानलं जातं.

समाजवादी विद्यार्थी संघटनेचा विद्यार्थी नेता राहुल दुबेला अध्यक्षपदासाठी 2365 मतं मिळालीयेत. राहुलनं अभाविपचा वाल्मिकी उपाध्यायचा पराभव केलाय. उपाध्यक्ष झालेला रोशन कुमार समाजवादी आणि भारतीय राष्ट्रीय संघटनेचा संयुक्त उमेदवार होता.

महामंत्रिपदावर अपक्ष असलेल्या अनिल यादवनं विजय मिळवलाय. त्यानं समाजवादी विद्यार्थी संघटनेला सोडचिठ्ठी दिली होती.