Automobile News l कार चालवताना AC वापरणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. पण कधीकधी एसीचा वापर करणे हे देखील घातक ठरू शकते. अशातच डेहराडूनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्क केलेल्या कारमध्ये एक पुरुष आणि एक महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. हे दोघेही एसी सुरू असलेल्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये झोपले होते आणि एसी गॅस आणि तापमानामुळे त्यांचा जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
AC ने घेतला दोन जणांचा जीव :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, डेहराडूनच्या राजपूर भागात AC ने दोन जणांचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. डेहराडूनमधील नागल वली रोडवर एक वॅगन आर कार उभी असल्याची माहिती पोलिसांना नियंत्रण कक्षाद्वारे मिळाली, ज्यामध्ये एक पुरुष आणि एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा महिला व पुरुष दोघेही मृतावस्थेत पडले होते. त्यावेळी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ते दोघेही वारंवार दारूचे सेवन करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेच्या वेळी गाडीचा इग्निशन ऑन होता. मात्र रात्री गाडीचा एसी सतत सुरू असल्याने गॅस आणि तापमानाचा परिणाम होऊन दोघांचा मृत्यू झाला असावा असे पोलिसांनी तपासानंतर सांगितले आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.
Automobile News l नेमकं काय घडलं असावं? :
आजकाल बहुतेक लोक त्यांच्या कार पार्क करून आणि AC चालू ठेवून झोपतात. एसी चालू असल्यामुळे लोक सर्व खिडक्या बंद ठेवतात, अशा स्थितीत कारच्या केबिनमध्ये गॅस जमा होणे सामान्य आहे. पण हा प्राणघातक वायू केबिनमध्ये कसा येतो हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारच्या इंजिनमधून उत्सर्जित होणाऱ्या विषारी वायूंमुळे, प्रामुख्याने कार्बन मोनॉक्साईडमुळे कारमध्ये बसलेल्या लोकांचा श्वास गुदमरू शकतो. हा वायू एसी व्हेंटमधून वाहनाच्या केबिनमध्ये येतो.
गाडीत बसलेली व्यक्ती झोपली असेल तर त्याला त्याची जाणीवही होत नाही आणि तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची जागा कार्बन मोनोऑक्साइड घेते. त्यामुळे व्यक्तीचा हळूहळू ‘गुदमरून’ मृत्यू होतो. तज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात कार्बन मोनोऑक्साइड मोठ्या प्रमाणात भरला जातो तेव्हा त्याचा तडकाफडकी मृत्यू होऊ शकतो,
यापासून संरक्षण कसे करावे:
पार्क केलेल्या कारमध्ये झोपणे सुरक्षित नाही. पण जर आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आणि तुम्हाला कारमध्ये झोपावे लागले तर कारची खिडकी पूर्णपणे बंद करू नका. जेणेकरून कारच्या केबिनमधून वायू पडेल आणि ऑक्सिजन आत येईल. याशिवाय दारूच्या नशेत कधीही कारमध्ये झोपू नका, कारण हे सर्वात धोकादायक आहे. बहुतांश घटनांमध्ये नशेत असताना लोकांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. जर तो जागृत असता तर तो गुदमरल्यापासून जागा झाला असता, त्यामुळे त्याचा जीव देखील वाचू शकला असता.
News Title : AC Car Disadvantage
महत्त्वाच्या बातम्या-
जो पाठीराखा त्याच्यावरच गेम केलास!; डीपी दादाला नॅामिनेट केल्याने अंकितावर भडकली
पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा आणि कोट्यधीश व्हा!
पोकळ नेते उघडे पडतातच!; शिवरायांचा पुतळा कोसळ्याने किरण माने संतापले
श्रीकृष्णाची पूजा करताना अंकिता लोखंडेकडून चूक, नेटकरी भडकले!
मंकीपॉक्स टेस्ट करणं झालं सोपं; अवघ्या ‘इतक्या’ वेळात होणार टेस्ट