Top News महाराष्ट्र मुंबई

आजपासून मुंबईतील ‘या’ मार्गावर धावणार एसी लोकल!

मुंबई | कोरोना संसर्ग रोगाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे गेले अनेक महिन्यांपासून लोकल बंद होत्या. परंतू कोरोनाची मंदावलेली गती लक्षात घेता आजपासून सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर एसी लोकल धावणार आहे.

नव्या फेऱ्यांचा समावेश न करता वेळापत्रकातील साध्या लोकलच्या फेऱ्यांऐवजी एसी लोकलच्या दररोज दहा फेऱ्या चालविण्यात येणार आहे. एसी लोकस प्रत्येक स्थानकावर थांबणार आहे.

आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवशी एसी लोकल सकाळ-संध्याकाळ धावणार असून, रविवारी मेंन्टेनन्सकरिता लोकल धावणार नाही. एसी लोकलची पहिली फेरी कुर्ल्याहून पहाटे 5.42 वा सुरु होऊन सीएसएमटीला 6.12 वाजता पोहचेल.

दरम्यान, एसी लोकलचे भाडे फर्स्ट क्लासच्या भाड्यापेक्षा 1.3 पट जास्त असल्याने मध्य रेल्वेच्या एसी लोकलला कसा प्रतिसाद मिळतो ते पाहून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा विचार केला जाणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. तसेच लॉकडाऊनमुळे बंद असलेली ट्रान्सहार्बरवरील लोकलही आता लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या-

आता मला सगळेजण म्हणतात तु आयुष्यात काहीतरी करून दाखवलंस- राखी सावंत

धक्कादायक! ठाकरे सरकारमधील ‘या’ बड्या मंत्र्याच्या जिवाला धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर

तुमचं डोकं फुटेल पण एक आमदार फुटणार नाही- सुधीर मुनगंटीवार

लाच स्वीकारताना महिला वाहतूक पोलीस कॅमेरात कैद, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

धक्कादायक! आंदोलनात सहभागी संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या