बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोकणच्या मातीत काही बाभळी जन्माला आल्यात”; पहिल्याच वाक्यात ठाकरेंचा प्रहार

सिंधुदुर्ग | राज्यातील राजकारणात आज राणे आणि ठाकरे यांच्यातील जुगलबंदी रंगलेली पहायला मिळत आहे. कोकणाच्या विकासात भर घालणाऱ्या चिपी विमानतळाचा उद्धाटन सोहळा आज पार पडत आहे. यावेळी व्यासपिठावर राजकीय प्रतिस्पर्धी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे दोघेही उपस्थित होते. दोघांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे.

नारायण राणे यांनी आपल्या भाषणात शिवसेना आणि कोकणाच्या विकासावर आपली मतं व्यक्त केली आहेत. नारायण राणे यांच्या भाषणानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलायला उठले आणि खरी जुगलबंदी रंगली. ठाकरे यांनी पहिल्याच वाक्यापासून राणेंचा समाचार घ्यायला सुरूवात केली. कोकणाच्या मातीत बाभळीही उगवतात या शब्दात ठाकरे यांनी राणेंवर उपरोधिक टीका केली आहे.

राज्याचे राजकारण आधीच चिपी विमानतळ उद्घाटन सोहळ्यावरून पेटलेलं आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेत्यांना निमंत्रणावरून वाद निर्माण झाला आहे. यातच आता ठाकरे यांनी राणे यांना आपल्या ठाकरे शैलीत उत्तर दिलं आहे.

नारायण राणेंच्या प्रत्येक टोल्याला उद्धव ठाकरे यांनी प्रतिटोला लगावला आहे. हा क्षण राजकारण करण्याचा नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे. कोकणाच्या विकासासाठी आपण सर्वपरी प्रयत्न करत असल्याचं, उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला, नाहीतर कोणीतरी म्हणेल मीच बांधला”

नारायण राणे मुख्यमंत्र्यांसमोर पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंनी ना एकमेकांकडे पाहिलं, ना नमस्कार केला!

“कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य आमच्याकडून होणार नाही”

राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचाही आर्यनला पाठिंबा?, अरविंद सावंतच्या वक्तव्यानं खळबळ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More