ACB । अधिकाऱ्याकडे असलेली मालमत्ता पाहून पोलिसांनाही धक्का बसला. तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) सरकारी अधिकाऱ्याकडून तब्बल 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तेलंगणा राज्य रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटीचे (TSRERA) सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी शिवा बाळकृष्ण यांच्या मालकीच्या विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले.
100 कोटींहून अधिक किमतीची मालमत्ता
खरं तर अद्याप 4 बँक लॉकर्स उघडलेले नाहीत. त्यामुळे मालमत्तेत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अधिकारी शिवा बाळकृष्ण यांनी यापूर्वी हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये (HMDA) नगर नियोजन संचालक म्हणून काम पाहिले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 14 पथकांनी बुधवारी दिवसभर शोध सुरू ठेवला आणि गुरुवारी पुन्हा ही मोहीब राबवली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बुधवारी पहाटे 5 वाजता ही शोधमोहीम सुरू झाली अन् 20 ठिकाणी कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुरुवारीही सुरू राहू शकते. एसीबीच्या पथकांनी शिवा यांच्या एचएमडीए आणि रेरा कार्यालयांची झडती घेतली, तर बाळकृष्ण यांच्या घरावर आणि तपासाशी संबंधित इतर महत्त्वाच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले.
ACB ची मोठी कारवाई!
विविध ठिकाणी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये ही संपत्ती सापडली. बाळकृष्ण यांच्या घरावर, कार्यालयांवर, त्यांच्या नातेवाईकांच्या जागेवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले, ज्यात 100 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 40 लाख रुपये रोख, 2 किलो सोने, इतर मालमत्तेची कागदपत्रे, 60 महागडी घड्याळे, 14 मोबाईल फोन आणि 10 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
याशिवाय सरकारी अधिकारी असलेल्या बाळकृष्ण यांचे चार बँक लॉकर्स अद्याप उघडलेले नाहीत. एसीबीने जवळपास चार बँकांमधील लॉकर्स ओळखले आहेत. एसीबीच्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्याच्या निवासस्थानी कॅश मोजण्याचे यंत्र सापडले आहे. एचएमडीएमध्ये काम केल्यानंतर त्यांनी ही अफाट संपत्ती मिळवली होती. सध्या सुरू असलेल्या शोध मोहिमेत आणखी मालमत्ता सापडण्याची दाट शक्यता आहे.
बुधवारपासून सुरू झालेला तपास अन् छापेमारी गुरूवारी देखील सुरू राहण्याची शक्यता आहे. कारण अद्याप बाळकृष्ण यांच्या 4 बँक लॉकर्सची तपासणी झाली नाही किंबहुना ते उघडले नाहीत. त्यामुळे एसीबी यावर देखील लक्ष ठेवून आहे.
News Title- Telangana’s anti-corruption department has seized assets worth more than Rs 100 crore belonging to government officials and TSRERA secretary Shiva Balakrishna
महत्त्वाच्या बातम्या –
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांना मोठा धक्का, गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवर कोर्टाचे मोठे आदेश
Kangana Ranaut | ‘ड्रामा क्वीन’ नेमकं कुणाला डेट करतेय?, अयोध्येतील फोटोमुळे चर्चांना उधाण
Mira road | मीरारोड परिसरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई!
Manoj Jarange | आझाद मैदानात फक्त एवढ्याच लोकांना परवानगी; हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश