बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एनसीबीची मोठी कारवाई! 1127 किलो गांजा ‘या’ ठिकाणाहून केला जप्त

नांदेड | आर्यन खान ड्रग्ज प्रकरण झाल्यापासून राज्यात सगळीकडेच ड्रग्ज संबंधी हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जात आहे. मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अर्थात एनसीबीने कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. मुंबई एनसीबीच्या या पथकाने तब्बल 1 हजार 127 किलो गांजा नांदेड येथुन जप्त केला आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथुन जळगाव जिल्ह्यात गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती मुंबई एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने वाहतुकीकडे लक्ष ठेवायला सुरूवात केली. सोमवारी पहाटे नांदेड जिल्ह्यातील मांजरम येथे वाहनाची तपासणी करताना एका ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला.

देगलूरमार्गे नांदेडकडे जात असताना मांजरमजवळ या ट्रकला अडवून तपासणी करण्यात आली होती. या तपासात एनसीबी पथकाने 2 आणि 5 किलो वजनाच्या तब्बल 43 गोण्या जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या या 1 हजार 127 किलो गांजाची किंमत तब्बल 11 कोटींच्या आसपास असल्याची माहिती एनसीबीचे पथक प्रमुख सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.

गांजाची वाहतूक करत असलेला हा ट्रक जळगावचा असून त्याचं पासिंग नांदेडचं आहे. तर एनसीबी मुंबईच्या पथकाकडून या ट्रकचालक आणि क्लिनरला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तर एनसीबी पथक आता मुख्य आरोपीच्या मागावर आहे. एनसीबीने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे आंध्रप्रदेशातून खान्देशात होणारी ड्रग्ज तस्करी आता समोर आली आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

‘तुम्ही आधी तुरूंगातील जेवण घ्या’; अनिल देशमुखांना न्यायालयाचा दणका

‘हे’ राज्य पुन्हा एकदा लाॅकडाऊनसाठी सज्ज, न्यायालयात स्पष्ट केली भूमिका

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणून घ्या ताजी आकडेवारी

“एकेकाळी सत्तेत असलेले लोक हे करतायेत, हे दुर्दैव आहे”

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More