पाच राज्यातील दारूण पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
नवी दिल्ली | देशातील महत्त्वाच्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुका निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. सदर निकालांवरून पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागतंय. त्यातच आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
जनतेच्या निर्णयाचा नम्रपणे स्वीकार करा. ज्यांना जनादेश प्राप्त झाला आहे त्यांचे अभिनंदन. यावेळी राहुल गांधींनी काँग्रेसचे सर्व कार्यकर्त्यांचे आणि स्वयंसेवकांचे कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल आभार मानले आहेत. आम्ही या सर्व पराभवातून शिकू आणि सर्व भारतीयांसाठी लढत राहू, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
विशेष बाब म्हणजे पाच राज्यांपैकी पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. पंजाबमध्येही काँग्रेसला मोठा पराभव पत्कारावा लागला आहे. उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांनी कमान सांभाळली होती. मात्र, उत्तर प्रदेशातही काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. या पराभवांवरून राहुल गांधी यांनी आम्ही यातून काहीतरी शिकू, असं म्हटलं आहे.
दरम्यान, पाचही राज्यातील पराभवातून काँग्रेसची पुढील रणनीती कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यापुढे आम्ही सर्व पक्ष एकत्रित लढू, असं सांगितलं. राजकारणात पक्ष कधी ना कधी हरत असतो, त्यामुळे निराश होण्याची गरज नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“ठाकरे सरकारच्या या अहंकारामुळे महाराष्ट्राची….”; आशिष शेलारांचा हल्लाबोल
7 सेकंदाच्या व्हिडीओमुळे ‘ही’ मुलगी झाली व्हायरल, पाहा व्हिडीओ
सुशांत सिंह राजपूतच्या दोन्ही एक्स अचानक समोरासमोर अन्…, पाहा ‘तो’ व्हिडीओ
पंजाबच्या विजयानंतर आईला मिठी मारत भगवंत मान भावूक, पाहा ‘तो’ व्हिडीओ
बंदीनंतर संधी शोधणाऱ्या श्रीसंतची निवृत्तीची घोषणा, पाहा ‘तो’ भावनिक व्हिडीओ
Comments are closed.