Accident | माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात; सुनेचा मृत्यू, माजी खासदार जखमी

Accident

Accident | राजस्थानमधील एका बड्या राजकीय घराण्यासाठी मंगळवारचा दिवस काळ ठरला. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी चित्रा सिंह यांचा राजस्थानातील अल्वरमध्ये मोठा अपघात झाला. लक्षणीय बाब म्हणजे या अपघातात जसवंत सिंह यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून सुनेचा मृत्यू झाला आहे. चित्रा सिंह या भीषण अपघातात दगावल्या आहेत.

माजी खासदार मानवेंद्र सिंह हे त्यांच्या पत्नीसह 2018 मध्ये काँग्रेसमध्ये गेले. ते यापूर्वी भाजपमध्ये होते. मानवेंद्र त्यांच्या मुलासह गंभीर जखमी झाले असून दोघांवर उपचार सुरू आहेत. मंगळवारी संध्याकाळी हा अपघात झाला. या अपघातात बारमेरचे माजी खासदार मानवेंद्र यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला.

माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या गाडीचा अपघात

मानवेंद्र सिंह यांच्याशिवाय त्यांचा मुलगा हमीर सिंगही जखमी झाला आहे. मानवेंद्र सिंह यांचा मुलगाही कारमध्ये प्रवास करत होता. खरं तर दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना अल्वर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, मानवेंद्र सिंह यांची पत्नी या अपघातात वाचू शकली नाही.

दरम्यान, मानवेंद्र सिंह हे पत्नी आणि मुलासह दिल्लीहून जयपूरला येत होते. अशातच अचानक त्यांची कार महामार्गावरील डिव्हायडरला जाऊन धडकली. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या अपघातात मानवेंद्र यांच्या पत्नीला जीव गमवावा लागला.

Accident माजी खासदाराच्या पत्नीचा मृत्यू

मानवेंद्र आणि त्यांचा मुलगा हमीर सिंह याच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. नाकावर व चेहऱ्यावर गंभीर जखमा आहेत. दोन्ही जखमींवर अल्वर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले.

2018 च्या निवडणुकीपूर्वी मानवेंद्र यांनी पत्नी चित्रासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. राहुल गांधींनी त्यांचा पक्षात समावेश केला होता. 2018 मध्ये त्यांनी झालरपाटणमधून वसुंधरा राजे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण निवडणुकीत यश मिळाले नाही. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बाडमेरच्या शिवाना मतदारसंघातून निवडणूक लढवली पण त्यांना विजय मिळवता आला नाही.

News Title- Former Foreign Minister Jaswant Singh’s son’s car met with an accident and his daughter-in-law Chitra died
महत्त्वाच्या बातम्या –

Ram Mandir | 41 दिवस चालत गाठली अयोध्या; मुंबईच्या शबनमने व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Pakistan मध्ये निवडणूक रॅलीत बॉम्बस्फोट; इम्रान खान यांच्या पक्षाचे 4 जण ठार

Ashok Saraf यांचा ‘सर्वोच्च’ सन्मान! महाराष्ट्र भूषण जाहीर; CM शिंदेंची घोषणा

वर्ल्ड क्रिकेटचा कारभार Jay Shah यांच्याकडे? BCCI सचिव बड्या पदाच्या शर्यतीत!

Sukesh Chandrashekhar च्या फसवणुकीत जॅकलीनचाही ‘हात’, अभिनेत्रीच्या अडचणीत वाढ; ED चा मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .