मुंबईनंतर आता बिहारमध्येही चेंगराचेंगरी, 3 जणांचा मृत्यू

बिहार | बेगुसराय येथील सिमरिया घाटावर गंगास्नानावेळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 3 भाविकांचा दुर्देवी मृत्यू झालाय. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातीय.

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त गंगा घाटावर भाविकांची गंगास्नानासाठी गर्दी झाली होती. त्यावेळी एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीमध्ये जखमींची संख्याही मोठी आहे.

चेंगराचेंगरीनंतर भाविकांनीच बचावकार्य सुरू केलं. प्रशासन आल्यावर जखमींनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.