पुणे महाराष्ट्र

नवले ब्रिज परिसरात भीषण अपघात; ट्रकनं 7 ते 8 वाहनांना उडवलं

पुणे | नवले ब्रिज परिसरात एका भरधाव ट्रकने 7 ते 8 वाहनांना उडवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला. यात 6 जण जखमी झालेत. नवले ब्रिजवर वारंवार अपघात होत असतात.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठाचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की, यात एक महिला गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

मालवाहतूक ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे सात ते आठ वाहनांना धडक दिली. ज्यामध्ये सहा जण जखमी झालेत. घटनास्थळी लगेचच वाहतूक पोलीस दाखल झालेत.

कात्रजकडून नवले ब्रिजकडे येत असताना 14 टायर माळ येथे भरधाव ट्रक शोभणी हॉटेलसमोर आल्यानंतर त्याचे नियंत्रण सुटले आणि त्याने वाहनांना धडक दिली. त्याने कार, रिक्षा अशा 8 वाहनांना उडवलं.

थोडक्यात बातम्या-

“ओवैसीला विकत घेऊ शकेल असा अजुन कोणी जन्माला आलेला नाही”

“लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही आमचा विजय निश्चित”

कोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

“टू मच डेमोक्रॉसी”, म्हणत उर्मिला मातोंडकरांची मोदी सरकारवर जोरदार टीका

राज्य सरकारने घेतलेला निर्णय काहींच्या फारच जिव्हारी लागलाय- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या