बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक!

सातारा | पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळ येथील धनगरवाडी गावाजवळ विचित्र अपघात झाला आहे. एका ट्रकने विरूद्ध दिशेने जात 6 वाहनांना धडक दिली आहे. यामध्ये तीन जणांचा जागीच मुत्यु आणि दोन जण गंभीर असल्याची माहिती समजत आहे. अपघातामधील गाड्या सातारहून पुण्याच्या दिशेने जात होत्या.

भरधाव ट्रकने वॅगनर गाडीला धकड दिली, या धडकेत गाडीचा चक्काचूर झाला आहे. तर त्यानंतर दुधाचा ट्रक, स्कॉर्पिओ, मालवाहतूक ट्रक आणि आणखी एका वाहनाला धडक दिली आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. खंडाळा तालुक्यातील पोलीस आणि शिरवळमधील पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

ट्रॅक्टरच्या मदतीने चक्काचूर झालेल्या मारुती वॅगनर कारमधील मृतदेह काढण्यात आले. 3 मृतांची ओळख अद्याप पटली नसून जखमींना दवाखान्यात नेण्यात आलं आहे. त्यानंतर पोलीस जखमींच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधत आहेत.

दरम्यान, अपघात इतका भयानक होता की कारमधील मृतदेह बाहेर काढताना गाडीचा पत्रा तोडावा लागला. धनगरवाडीमधील गावकऱ्यांनी जखमींना दवाखान्यात नेण्यास मदत केली. अपघात झाल्यावर काही वेळासाठी वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. संबंधित ट्रकचालकावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

शिवसेनेला मोठा धक्का! तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री राहिलेल्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

‘एक चांगला कलाकार बनून सेटचा निरोप घेत आहे’, अक्षय कुमारच्या पोस्टनंतर चाहते भावूक

मनसे आमदार राजू पाटील यांची तळीये दरडग्रस्तांना 11 लाखांची मदत

अभिमान बाळगण्यापेक्षा सिंधूची जात शोधण्यात भारतीय व्यस्त; ‘हे’ राज्य आघाडीवर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More