Top News महाराष्ट्र मुंबई

“अपघात की घातपात?, काही गाफिलपणा झाला का तपासा”

मुंबई | वीज खंडित होण्यामागे काही गाफीलपणा झाला आहे का, याच्या तपासणीचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना दिले आहेत. तसेच तीन-साडेतीन तासांतच बहुतांश वीजपुरवठा सुरळीत केल्याचा दावा सरकारने केला आहे.

हा अपघात होता की घातपात, अशा प्रश्नांची सरबत्ती करत झालेल्या घटनेची सर्वंकष चौकशी करण्याचे तसेच यापुढे याची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी याबाबत ‘वर्षा’ निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत दिले.

येत्या चार दिवसांत मुसळधार परतीच्या पावसाचा अंदाज असून यादृष्टीनेही विजेच्या मागणीचा विचार करून सतर्क राहण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

महत्वाच्या बातम्या-

दिल्ली कॅपिटल्सचा मोठा धक्का! दुखापतीमुळे ‘हा’ खेळाडू स्पर्धेबाहेर

राज्यात उद्या, परवा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही”

“मराठा समाजाची माफी मागा, अन्यथा तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या