पुणे | पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये फॅशन स्ट्रीटला शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये जवळपास 800 दुकानं खाक झाली आहेत. तसेच व्यापाऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. साधारण 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मात्र याच दरम्यान कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट बाजारपेठला लागलेली आग विझवून घरी घरी परतत असताना पुणे कॅन्टोन्मेंटचे अग्निशमन दलाचे अधीक्षक प्रकाश हसबे यांचं अपघातामध्ये निधन झालं आहे.
प्रकाश हसबे हे घरी जात असताना त्यांना पीएमपी बसने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. येरवड्यातून विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. दोन तासात परत येतो, असं सांगून हसबे कॅम्प येथून ते घरी निघाले होते. येरवडा मार्गवरून जात असताना त्यांचा दुर्देवी अपघात झाला.
कॅम्प परिसरातील ही आगीची घटना पंधरा दिवसातील दुसरी आहे. तसेच काही दिवसांपूर्वी शिवाजी मार्केटमध्ये देखील आग लागली होती. पुण्यातील कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट हे कपड्यांसाठी प्रसिद्द आहे. या आगीत व्यापारांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं असून, नेमकी आग लागली कशी याबद्दल चौकशी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, पुणे कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनी प्रकाश हसबे यांच्या अपघाती निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
“फुकटात मंत्रिपद मिळालेल्या आव्हाडांची उगाच वळवळ सुरूये, कोणाची एजंटगिरी करताय?”
सचिन तेंडूलकरला कोरोनाची लागण; नुकतीच खेळली होती वर्ल्ड सिरीज
टीव्हीवर सामन्याचे प्रक्षेपण दोन ते अडीच सेकंड लेट, मग बुकींनी डोंगरच गाठला थेट!
अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण!
‘…तर मग मोदींनी सत्याग्रह कशासाठी केला?’; ‘या’ शिवसेना खासदाराची मोदींवर बोचरी टीका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.