बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात, देवासारखे धावून आले मात्र त्यांना हिरावून नेले!

मुंबई | सोमवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. हायवे वरच्या गाड्यांच्या वेगाने अनेक अपघात होतात. मात्र अपघात झाल्यावर मदतीस धावून जाणाऱ्या देवदूतांनाच आपला प्राण गमवावा लागल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला आहे. या अपघातानंतर संपुर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या स्वीफ्ट टॅक्सीला कंटेनरने मागून धडक दिली होती. त्यांना मदत करण्यासाठी पनवेलच्या रुग्णवाहिका असोसिएशनचे अध्यक्ष सुशांत मोहिते आणि प्रथमेश बहिरा तेथं गेले होते. यादरम्यान पनवेलचे नगरसेवक तेजस कांडपिले देखील तिथं आले. याचवेळी अचानक पनवेल नगरसेवकांच्या मर्सिडीज कारला टेम्पोने मागून धडक दिली.

टेम्पोने दिलेल्या धडकेमुळे देवदूतासारखे मदतीसाठी धावून गेलेल्या सुशांत आणि प्रथमेशचा जागीच मृत्यू झाला. या कारणामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नगरसेवक तेजस कांजपिले देखील यामध्ये जखमी झाले असून संबंधित जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर, पनवेल जवळ सोमवारी रात्री अनेक गाड्यांचा भीषण अपघात झाला आहे. या मल्टी व्हेइकल अपघातातील इतर जखमींना पनवेलच्या अष्टविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तसेच संबंधित मृत झालेल्या सुशांतचं वय 26 वर्ष तर प्रशमेशचं वय 24 वर्ष असं होतं.

थोडक्यात बातम्या-

अभिमानास्पद! ग्लोबल टीचर डिसले गुरुजींच्या नावाने परदेशात शिष्यवृत्ती सुरू

चेन्नईच्या विजयानंतर जडेजाचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

देशातील पहिल्या ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ला अनिल परबांनी दाखवला हिरवा झेंडा

“देवेंद्र फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?”

…म्हणून उद्धव ठाकरेंनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More