बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहिणीचा पतीसह अपघाती मृत्यू

बीड | बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात मादळमोही येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात भाजपचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चूलत बहीण आणि भाऊजी जागीच ठार झाले आहेत. ममता पल्लेवाड आणि विलास पल्लेवाड असे अपघातात ठार झालेल्या दांपत्याचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी ही दुर्देवी घटना घडली आहे.

पल्लेवाड दांपत्य मुलाला भेटण्यासाठी स्वत:च्या कारने पुसद येथून गाडीने पुण्यात मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मातोरीजवळ कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार भरधाव वेगात असल्याने पुलाखाली पडून हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला होता. अपघातानंतर परिसरातील लोकांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला फोन केला.

या अपघातानंतर जवळच असलेल्या तिंतरवणी येथे एक गाडी भरधाव असल्याने पुलाखाली जाऊन अपघात झाला. यामध्ये दोघे पती पत्नी जागीच ठार झाले अशी माहिती नागरीकांनी पोलिसांना दिली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  त्यांना घटनास्थळावरून इस्पीतळात हलवण्यात आलं.

दरम्यान, पोलिसांनी ममता पल्लेवाड आणि विलास पल्लेवाड यांना उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणलं. ममता पल्लेवाड या माजी अर्थमंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहिण आहे.  ही माहिती समोर आल्यावर त्यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

थोडक्यात बातम्या

मी शरद पवारांच्या तालमीत तयार झाले, त्यामुळे…- चित्रा वाघ

“मी मर्द आहे हे उद्धव ठाकरेंनी परत कधीही म्हणू नये”

संजय राठोडांसाठी जमलेल्या गर्दीत कोरोना; महंत कबीरदास यांच्यासह 19 जण पाॅझिटिव्ह

‘कोरोनापासून बचावासाठी मी रोज…’; ‘या’ भाजप नेत्याचं अजब वक्तव्य

मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More