बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अखेरच्या श्वासापर्यंत दिली साथ; पतीच्या मृतदेहाला मिठी मारून पत्नीने सोडला जीव

पाटणा | बिहारच्या भागलपूरमधील कहलगावात एका वृद्धाचं निधन झालं. या वृद्ध शेतकऱ्याचं वय 100 वर्षे इतकं होतं. पतीच्या निधनाचं वृत्त पत्नीला सहन झालं नाही. वृद्ध पतीच्या मृत्यूची बातमी कळताच 90 वर्षीय पत्नीनेही तिचा प्राण सोडला.

ही घटना कहलगावच्या परिसरातील आहे. जागेश्वर मंडल यांचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. सकाळी पतीच्या निधनाची वार्ता समजताच रुक्मिणी देवी यांनी त्यांचे प्राण सोडले. पती जागेश्वर मंडल यांच्या मृत्यूनंतर रुक्मिणी यांनीही अखेरचा निरोप घेतला.

पतीला दिलेलं वचन शेवटच्या श्वासापर्यंत पत्नीने निभावलं. हे दोघंही वृद्ध होते. जागेश्वर मंडल यांनी मृत्यूपूर्वी खाणं-पिणं सोडून दिलं होतं. जागेश्वर मंडल यांच्या मृत्यूनंतर रुक्मिणी त्यांच्या मृतदेहाजवळ गेल्या. त्यांनी पतीला घट्ट मिठी मारली. हातात हात घेतला आणि प्राण सोडले.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  दोघंही संपत्तीने गरीब असले तरी मनाने, प्रेमाने श्रीमंत होते दोघांमध्ये प्रचंड प्रेम होतं. कधीही वादविवाद झाला नाही, असं शेजाऱ्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या काही याचिका NCP स्पॉन्सर्ड”

“मला, पत्नीला आणि मुलीला कोणी जीवे मारलं तर त्याला शरद पवार जबाबदार असतील”

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी रामदास आठवलेंनी सांगितला ‘हा’ उपाय

देशावर कोरोनाचं संकट; आरबीआयने केली ‘ही’ मोठी घोषणा

‘अशोक चव्हाण साधे केळी विकायच्या लायकीचे नाहीत’; ‘या’ भाजप नेत्याची बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More