बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicronबाबत केलेल्या अभ्यासातून ‘ही’ दिलासादायक माहिती समोर, तज्ज्ञ म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनने (Omicron) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. सरकारने ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ओमिक्रॉन व्हेरियंट पूर्वीच्या व्हेरियंटपेक्षाही अधिक वेगाने पसरत आहे. त्यामुळे भारतासह सर्वच देशांची चिंता वाढली आहे. मात्र, आता ओमिक्रॉनबाबत एक दिलासादायक माहिती समोर येत आहे.

दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी ओमिक्रॉनबाबत केलेल्या आभ्यासातून नविन माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये इतर व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांच्या तुलनेत ओमिक्रॉन झालेले रुग्ण रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता 80 टक्के कमी आहे, अशी माहिती या अभ्यासातून समोर आली आहे.

याशिवाय, ओमिक्रॉनची लागण झालेल्या लोकांना इतर व्हेरियंटची लागण झालेल्या लोकांच्या तुलनेत गंभीर आजार होण्याची शक्यता 70 टक्क्यानं कमी आहे, अशीही माहिती दक्षिण आफ्रिकेत करण्यात आलेल्या आभ्यासातून समोर आली आहे. मात्र, ओमिक्रॉन किती वेगाने पसरू शकतो, हे त्या देशातील लसीकरणाच्या प्रमाणावर अवलंबून आहे.

दरम्यान, भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी 90% लोकांना ओमिक्राॅनच्या संसर्गाचा धोका आहे. अशी माहिती यापूर्वी झालेल्या प्राथमिक संशोधनातून समोर आली होती. याशिवाय अमेरिकन औषध निर्माती कंपनी मॉडर्नानेदेखील त्यांनी बनवलेला बुस्टर डोस हा ओमिक्रॉनवर  प्रभावी असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ओमिक्रॉनबाबत दिलासादायक चित्र निर्माण झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC कशी करायची? वाचा सविस्तर

राजकारणातील गुन्हेगारीला आळा बसणार; निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेतील तिसरा हप्ता मिळण्याची तारीख जाहीर

‘स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्यांना अशा नकला कराव्या लागत आहे’; दानवेंची सरकारवर बोचरी टीका

“आपल्याच आमदारांवर विश्वास नसलेलं हे सरकार आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More