Top News महाराष्ट्र मुंबई

‘अभिनेत्री वॅाशरुमध्ये असताना…’; पंचतारांकित हॅाटेलमध्ये अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रकार

मुंबई | मुंबईमधील एका पंचतारांकित हॅाटेलमध्ये एका अभिनेत्री सोबत गैरवर्तन घडल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडीत अभिनेत्री एका वेबसिरीजच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने हॅाटेलमध्ये राहत होती.

वेबसिरीजचं चित्रीकरण संपवून ती अभिनेत्री हॅाटेलमधील वॅाशरुमध्ये कपडे बदलण्यासाठी गेली असताना तिच्यासोबत हा गैरप्रकार झाल्याचं समजतंय.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॅाटेलमध्ये हा गैरप्रकार झाला आहे.

रविवारी हॅाटेलमधील एका कर्मचाऱ्याविरोधात मुंबईतील एन.एम.जोशी मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री पंचतारांकित हॅाटेलमधील 37 व्या मजल्यावरील एका वॅाशरुमध्ये कपडे बदलायला गेली होती. त्यावेळी अचानक आरोपी दिलेश्वर महंत याने तिला पकडून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

पीडीत अभिनेत्रीने ओरडण्याचा प्रयत्न करताच आरोपीने तिला घट्ट पकडून ठेवलं. आरोपीच्या तावडीतून पीडितेने स्वत:ची कशीतरी सुटका करुन घेतली. त्यानंतर हॅाटेलमधील इतर कर्मचाऱ्यांनी आरोपी महंतला ताब्यात घेतलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आजचा हिंदू समाज सगळा सडलेला आहे’; शरजील उस्मानीचं वादग्रस्त वक्तव्य

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ‘या’ मराठी दिग्दर्शकाला एनसीबीनं घेतलं ताब्यात

शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना कायमची शत्रू नाही’; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य

‘ट्रॅक्टर आणि जेसीबी…’; संजय राऊत-राकेश टिकैत भेटीवर कुणाल कामरा म्हणाला…

“शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठीच तिरंगा अपमानाचे कुभांड रचलं हे उघड झालं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या