बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बुधवार पेठेत महिलेची हत्या केलेल्या आरोपीला अटक, ‘असा’ होता कट

पुणे | गुन्ह्यांचे शहर म्हणून गेल्या काही दिवसांपासुन चर्चेत असणाऱ्या पुण्यात या आठवड्यात सलग तीन दिवस मृत्यूचं तांडव चालू होतं. पुण्यात या आठवड्यात एकूण तीन मृतदेह आढळले. काही दिवसांपुर्वी एका पोलिसाची हत्या करण्यात आली असून त्याबाबत तपास चालू असताना काही तासातच बुधवार पेठेतील एका देहविक्री करणाऱ्या महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला. याच महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला आता अटक करण्यात आली आहे.

बुधवारपेठेत वेश्या म्हणून काम करणाऱ्या एका महिलेचा खून करण्यात आला होता. ही घटना चार दिवसांपुर्वीची आहे. संबंधित महिलेचा मृतदेह मध्यरात्री सुमारे 3 वाजताच्या दरम्यान पोलीस हवालदाराच्या खूनाचा तपास चालू असताना आढळला होता. त्यानंतर महिलेची हत्या करणाऱ्या आरोपीचा शोध चालू करण्यात आला. यादरम्यान, संबंधित महिलेचं नाव राणी मन्नाफ शेख असं असून आरोपीचं नाव मोहम्मद बहरुल हक्क आहे असं समोर आलं.

महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी आसामला पसार होण्याच्या तयारित होता. मात्र पळून जाण्याआधीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अवघ्या 72 तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं. तपासादरम्यान, आरोपीचा केवळ फोटो आणि नाव समोर आलं होतं.

दरम्यान, मृत झालेल्या महिलेचं वय हे केवळ 23 वर्ष होतं. तसेच अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान आपण हा खून केला असल्याची कबुली आरोपी मोहम्मद याने दिली. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच हळहळ व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“रुग्ण कमी होत आहे म्हणून सुखावून जाऊ नका, तिसरी लाट दारावर”

‘कोरोना सेंटरमध्ये भरती होण्यासाठी कोरोना रिपोर्टची आवश्यकता नाही’; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश

संजय राऊतांनी ममता बॅनर्जींना दिली अहिल्याबाई होळकरांची उपमा, म्हणाले…

#सकारात्मक_बातमी | सात महिन्यांच्या बाळाची कोरोनासह ट्युमरशी यशस्वी झुंज

“मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतात, मग योग्य कोण?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More