बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खळबळजनक! भररस्त्यात सोनसाखळी चोराने आठ महिन्यांच्या गर्भवतीला फरफटत नेलं

चेन्नई | सोनसाखळी चोरीच्या उद्देशाने गर्भवतीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चेन्नईमध्ये एका चोराने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरण्यासाठी तिला चक्क रस्त्यावरुन फरफरटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पल्लवरम शहरातील रेणुका नगर भागात राहणारी 25 वर्षीय महिला आठ महिन्यांची गर्भवती आहे. या महिलेचं नाव गीता असं आहे. शुक्रवारी सकाळी ती घरासमोर असलेल्या देवाची नियमितपणे पूजा करत होती. ती डोळे बंद करुन देवाची प्रार्थना करत असतानाच दोघे जण दुचाकीवरुन मुख्य रस्त्यावर येऊन थांबले. दुचाकीवर मागे बसलेला तरुण तिच्याकडे गेला. गीता बेसावध अवस्थेत असतानाच त्याने तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली.

गीताने प्रतिकार करत गळ्यातील चेन आणखी घट्ट पकडली. त्यामुळे दोघांमध्ये काहीशी झटापट झाली. तिचा प्रतिकार सुरुच असल्यामुळे हल्लेखोराने तिला खेचत रस्त्यापर्यंत नेलं. या झटापटीत गीता खाली पडली तरी त्याने तिला फरफटत नेलं. अखेर तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात हल्लेखोर यशस्वी झाला. त्यानंतर दोन्ही आरोपी त्यांच्या दुचाकीवरुन फरार झाले. या घटनेत गीताला दुखापत झाली आहे.

दरम्यान, गीताचे पती रामचंद्र यांनी पल्लवरम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज सोमवारी व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना आम्ही लगेच अटक करु, असं आश्वासन देखील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा?, मुख्यमंत्र्यांंनी जरा विचार करून बोलावं”

इथे मृत्यूही ओशाळला… एका पाठोपाठ एक मृतदेह, विद्युतदाहिन्याची धुरांडी वितळली!

‘मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या तोंडाला पानं पुसली’; चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

“पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

रमजानसाठी सरकारकडून मार्गदर्शक सुचना जारी; वाचा काय आहेत निर्बंध

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More