संतोष देशमुख हत्या प्रकरण…; अखेर सुदर्शन घुलेच्या मुसक्या आवळल्या?

accused sudarshan ghule sudhir sangale arrested

Sudarshan Ghule | बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. त्याची सध्या कसून चौकशी केली जातेय. आतापर्यंत या प्रकरणात जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले(Sudarshan Ghule), कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार होते. मात्र, आता या तीन फरार आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय.(Santosh Deshmukh case)

देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपींचा हात असल्याचं बोललं जातंय. यातील कथित मास्टरमाईंड वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. 31 डिसेंबररोजी तो स्वतः सरेंडर झाला. केज कोर्टाने कराडला 15 दिवसांची कोठडी सुनावली आहे. या घटनेतील इतर तीन आरोपी फरार होते. अशात आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक झाल्याची माहिती आहे.

फरार 3 आरोपींपैकी दोघांना अटक

सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या दोघांना पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. तर, तिसरा आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायबसे यांना पोलिसांनी याआधीच अटक केली होती.या डॉक्टरने चौकशीत दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आता सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) आणि सुधीर सांगळे यांचा शोध घेत त्यांना अटक केल्याची माहिती आहे. (Santosh Deshmukh case)

दरम्यान, पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनी प्रकल्प अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात 11 डिसेंबर 2023 रोजी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात विष्णू चाटे, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे तिघे आरोपी आहेत. या तिघांनाही आता अटक झाली आहे.

खंडणीचे प्रकरण काय आहे?

पवनचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनी प्रकल्प अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी 2023 मध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये विष्णू चाटे, वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि सुदर्शन घुले यांची नावे आहेत. या तिघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान,  कराडच्या सुनावणीवेळी चाटेचा कबुलीजबाब सीआयडीने अहवालात नमूद केलाय. यामध्ये चाटे यानेच कराडचे कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिल्याची कबुली दिली असल्याचं समोर आलंय.

आता या कबुलीजबाबाच्या अनुषंगाने पोलीस कराडकडे या सर्व गुन्ह्यांबाबत तपास करतील.तसेच, सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खूनप्रकरणात त्याचा काय सहभाग आहे? या अनुषंगाने देखील तपास केला जाणार आहे. विष्णू चाटेच्या या कबुलीमुळे आता वाल्मिक कराड आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Sudarshan Ghule)

News Title – accused sudarshan ghule sudhir sangale arrested

महत्त्वाच्या बातम्या-

विष्णू चाटेनं अखेर तोंड उघडलं, वाल्मिक कराडबाबत दिली अत्यंत धक्कादायक कबुली

संतोष देशमुख हत्याप्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर!

महाराष्ट्रातील राजकारण तापणार?, परभणीत आज सर्वपक्षीय मूक मोर्चा

“हिंदीच बोलायचं, मराठीत बोलला तर…”; पुण्यात मराठी-हिंदी वाद पेटला, नेमकं काय घडलं?

शरद पवार महायुतीत सामील होणार?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .