राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल

रत्नागिरी | लोटे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री खेड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. 

लोटे पंचक्रोशीतील गावकरी दूषित पाण्यामुळे त्रस्त आहेत. त्याची तक्रार गावकऱ्यांनी संजय कदम यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी या मंडळाला भेट दिली.

या भेटीत अधिकाऱ्यांसोबत बोलत असताना त्यांच्यात बाचा-बाची झाली. त्यात कदम यांनी तेथील अधिकाऱ्याला मारहाण केली. 

दरम्यान, याच प्रकरणी कदम यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-अयोध्येतील राम मंदिर उभारणीत सर्वात मोठा अडथळा काँग्रेसच!

-एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात का घेत नाहीत?; कार्यकर्त्यांनी दानवेंना धारेवर धरलं

-…तर ‘अवनी’च्या मृत्यू प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू!

-सैनिकांच्या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेता; तसं अवनीच्या मृत्यूचं पापही घ्या!

-आरोपांमुळे मुनगंटीवार संतापले; निरुपमांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या