मुंबई | शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्या दिवसापासून आपला गटच खरी शिवसेना असा दावा केला आहे. त्यानंतर शिवसेनेत मोठा गोंधळ निर्माण झाला होता. शिवसेनेने हा दावा फेटाळत लावला आणि एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षनेते पदावरुन हाकलपट्टी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट मुळ शिवसेनेवर दावा करु शकत नाही. शिंदे यांना पक्ष विलीन करण्याशिवाय पर्याय नाही, असं मत माजी लोकसभा सचिव पीडीटी अचारी यांनी मांडलं. शिंदेेंना आपण मुळ शिवसेना आहोत, असा दावा करता येणार नाही. यासंबधी शिंदे यांची याचिका ग्राह्य धरली जाणार नाही, असं मत अचारी यांनी मांडलं. शिवसेनेच्या 37 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर ते कायद्याला अनुसरुन असेल. असंही अचारी म्हणाले.
दोन तृतीअंश आमदारांसह पक्षांतरच त्यांना पक्षांतर विरोधी कारवाई पासून वाचवू शकतो. विलीनीकरनासाठी दोन अटी आहेत. एक, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये विलीनीकरन करणे किंवा दुसरी अट दोन तृतीअंश आमदार विलीनीकरणाठी सहमत आहेत, हे निवडणूक आयोगाला सांगणे. 37 आमदार गट म्हणून काम करु शकत नाहीत व शिवसेनेवर दावा करु शकत नाहीत, असे कायद्यातील बारकावे अचारी यांनी सांगितले.
शिंदे गट आता काय निर्णय घेणार? ते भाजपमध्ये विलीन होणार का? का आणखी कोणते नवीन राजकारण महाराष्ट्राला पहायला मिळणार? याकडे कायद्याचं, जनतेचं, आमदारांचं आणि शिवसेनेचं लक्ष आहे.
थोडक्यात बातम्या –
राज्यातील नवीन सरकारबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….
“तीन दशकातील मराठी रंगभूमीला व्यामीश्र संघर्षाची पार्श्वभूमी”
“शिवसेनेची एकनाथ शिंदेंवरील कारवाई बेकायदेशीर, त्याला आम्ही कायदेशीर उत्तर देऊ”
शिवसेनेने जारी केलेल्या व्हिपबद्दल एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले, म्हणाले…
कोरोनाने टेंशन वाढवलं, 24 तासातील धडकी भरवणारी आकडेवारी समोर
Comments are closed.