देश

आचार्य बाळकृष्ण यांचा ‘रुची सोया’ कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा

नवी दिल्ली | आचार्य बाळकृष्ण यांनी त्यांच्या रुची सोया कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. अन्य कामांमध्ये अधिक व्यस्त असल्यानं हा राजीनामा दिल्याचं आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितलं आहे.

आचार्य बाळकृष्ण यांनी व्यस्त असल्यामुळे तात्काळ प्रभावानं रुची सोया या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळानं त्यांचा राजीनामा स्वीकारला असून त्यांना पदावरून कार्यमुक्त केलं आहे, अशी माहिती कंपनीनं दिलीये.

कंपनीच्या पूर्णवेळ संचालकपदी कार्यरत असलेल्या राम भरत यांच्याकडे व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

रूची सोया या पतंजली समुहाच्या कंपनीचा नफा जून तिमाहीमध्ये 13 टक्क्यांनी कमी झाला होता. बुधवारी कंपनीकडून जून तिमाहीच्या निकालांची घोषणा करण्यात आली. यादरम्यान कंपनीच्या नफ्यात 13 टक्क्यांची घट होऊन तो 12.25 कोटी रूपये झाला आहे.

महत्वाच्या बातम्या –

 “…म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे”

खळबळजनक! एमडीचं शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीची डोकं चिरडून निर्घृण हत्य

“सुशांत सिंग प्रकरणी खऱ्या गुन्हेगारांचा लवकरच पर्दाफाश होईल

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याचा अतिरिक्त कार्यभार

“…त्यामुळे न्याय आणि कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या