दलित-आदिवासी नव्हे, हनुमान तर जैन होते; जैन मुनींचा दावा

जयपूर | राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांमध्ये हनुमानाच्या जातीचा उल्लेख होत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी हनुमान दलित होते, असं म्हटलं. त्यावर आचार्य निर्भय सागर यांनी हनुमान जैन होता, असा दावा केला आहे. 

‘जैन दर्शन’ या ग्रंथासह अनेक ग्रंथ आहेत ज्यात हनुमान जैन असल्याचा उल्लेख आहे. एवढेच नाही तर हनुमान पहिला क्षत्रिय होता आणि जैन दर्शन या ग्रंथात त्यासंदर्भातही उल्लेख आहे, असं निर्भय सागर यांनी सांगितलं. 

एवढंच नाहीतर हनुमान यांनी संन्यास घेतला आणि जंगलामध्ये गेल्यावर दीक्षा घेतली, असंही निर्भय सागर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हनुमानाला राजकारणात योगी अादित्यनाथ यांनी आणले. त्यानंतर भाजपच्याच एका नेत्याने हनुमान आदिवासी असल्याचं वक्तव्य केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-पत्नीच्या दारु आणि शाॅपिंगच्या व्यसनाला कंटाळलेल्या पतीने केली आत्महत्या

-शेतकऱ्यांच्या आजच्या परिस्थितीला नेहरुच जबाबदार- नरेंद्र मोदी

-निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीव तोडून प्रचार

-बजरंग दलाचा जिल्हाध्यक्ष-बुलंदशहर हिंसाचाराचा मास्टरमाईंड गजाआड

-आर्चीनं कमावली झीरो फिगर; नवं रुप तुम्ही पाहिलं का???