Top News जळगाव महाराष्ट्र

“रोहिणीताई, राष्ट्रवादीने तुमचं केलेलं नुकसान पुढील विधानसभेला व्याजासकट भरुन काढू”

जळगाव | भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये गेलेले एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक आश्वासन दिलं आहे. जयंत पाटील मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी परिवार परिसंवाद यात्रेनिमित्त बोलत होते.

रोहिणी खडसे यांचं जे नुकसान मागच्या निवडणुकीत आम्ही केलं ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू. 15 टक्के मताधिक्याने रोहिणी खडसेंना निवडून आणू त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिलं आहे. जयंत पाटलांच्या या आश्वासनाने राष्ट्रवादीने पुढील विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंना उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात आहे. तशा प्रकारचे संकेतही जयंत पाटलांनी आपल्या भाषणातून दिले आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसेंचं तिकीट कापत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंना पराभूत केलं होतं. पाटलांनी दिलेल्या आश्वसनाप्रमाणे रोहिणी खडसे पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीपरिवारसंवाद यात्रेचा शेवटच्या दिवशी जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपच्या शेकडो आजी माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

थोडक्यात बातम्या-

‘…तर मीच आत्महत्या करेन’; पूजा चव्हाणचे वडील आक्रम

…तर लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल- रामदास आठवले

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ढोंगीजीवी- नाना पटोले

जेनेलिया देशमुखने शेअर केला बेडवर डान्स करतानाचा व्हीडिओ, पाहा व्हीडिओ

“ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी विकास करण्याऐवजी भानगडी केल्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या