बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘त्या’ पत्रावरून आचार्य तुषार भोसले यांची शरद पवारांवर बोचरी टीका, म्हणाले…

मुंबई | कोरोना संकटाच्या काळात अनेक व्यवसाय-धंद्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर शरद पवार यांच्यावर भाजप नेत्यांनी कडाडून टीका केली होती. त्यानंतर आता आचार्य तुषार भोसले यांनी देखील शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे.

आजारपणातून उठल्या उठल्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली की, बारचालकांना करामध्ये सवलत देण्यात यावी. वीजबिलात सूट देण्यात यावी. खरंतर या सरकारचं मंदिरापेक्षाही मदिरेवर आणि बार चालकांवर प्रेम का आहे ?, याचं उत्तर आता कळायला लागलं आहे. कारण या सरकारचे निर्मातेच बारधार्जिणे आहेत, अशी टीका आचार्य तुषार भोसले यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे.

लॉकडाऊनमुळं राज्यातील हॉटेल व्यावसायिक पर्यटन उद्योग तसेच इतर व्यावसायिक अडचणीत आले आहेत. या अडचणीत त्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना वीज बिलात आणि मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणी शरद पवारांनी केली होती.

दरम्यान, शरद पवार शेतकऱ्यांसाठीही एखादं पत्र पाठवाल अशी अपेक्षा आहे. 100 कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत आपली कळकळ पाहून माझा कंठ दाटून आला आहे हे. मी नमूद करू इच्छितो, असा टोला भातखळकर यांनी शरद पवारांना लगावला होता.

थोडक्यात बातम्या-

नवविवाहीत नवरीने केलेल्या ‘या’ कृत्याने नवराच नाही तर संपूर्ण सासरवाडीला हादरवून सोडलं!

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू; ‘हा’ महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

इंग्लंडच्या फलंदाजांची झोप उडणार; भारतीय संघात ‘या’ नव्या डावखुऱ्या गोलंदाजाची एन्ट्री

अभिनेत्री कंगणा राणावतला कोरोनाची लागण!

हृदय पिळवटून टाकणारी घटना; तीन भावांचा एकापाठोपाठ कोरोनामुळे मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More