बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उद्धव ठाकरे- अजित पवार आता तयार रहा…’; आचार्य तुषार भोसले भडकले

औरंगाबाद | बंडातात्यांच्या अटकेनंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुघलांपेक्षा ठाकरे सरकार अत्याचारी आहे, असं म्हणत तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी आहे. मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते. भागवत धर्माची भगवी पताका घेऊन जाणाऱ्या बंडातात्या आणि वारकऱ्यांना अटक करणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?, असा सवाल तुषार भोसले यांनी विचारला. बंडातात्यांच्या अटकेनंतर शिवसेनेला आता भगवा झेंडा हातात घेण्याचा अधिकार नाही, असं म्हणत आचार्य तुषार भोसले यांनी शिवसेनेला देखील लक्ष्य केलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्य सरकारने आषाढी वारी सोहळ्यावर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. वाखरीपासून दीड किलोमीटर अंतरापर्यंत प्रतिकात्मक पायी वारी काढली जाणार आहे. मात्र सामान्य वारकऱ्यांना मात्र पायी वारीस मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, शासनाचा आदेश झुगारुन पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं आहे. त्यांना दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे.

थोडक्यात बातम्या- 

काही गैरसमज झाले पण यापुढे असं होणार नाही- अजित पवार

बंडातात्या कराडकर पायी वारीवर ठाम; सरकारचा आदेश झुगारल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात

केंद्र सरकारविरोधात बाॅलिवूडचे कलाकार एकवटले, नव्या सिनेमॅटोग्राफ विधेयकाला जोरदार विरोध

“सरकार स्थापन झाल्यापासून तिघांच्या खिशात खंजीर, कधी कधी एकमेकांना खुपसतील सांगता येत नाही”

जो समाज मागासलेलाच नाही त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही- गुणरत्न सदावर्ते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More