बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! बीडमध्ये तरूणीवर अॅसिड हल्ला; हल्ल्यानंतर जिवंत जाळलं

बीड | बीडमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका तरूणीवर अॅसिड हल्ला करून तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आलंय. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय.

दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणाऱ्या एका 22 वर्षीय तरूणीवर अॅसिड हल्ला केला आणि त्यानंतर तिला ट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाटमध्ये घडलीये. या तरुणीचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

ही तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतत असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अ‍ॅसिड हल्ला करत पेट्रोल टाकून तिला पेटवून दिलं.

या सर्व प्रकारानंतर तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. जवळपास 12 तास ही तरूणी अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी रस्त्या लगत पडलेली होती. या पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला होता. अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध पोलीसांत गुन्हा नोंद झालाय. मात्र उपचार सुरू असताना रविवार पहाटे तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा नितीश कुमारांची वर्णी; उद्या घेणार शपथ

प्रसिद्ध अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचं निधन

पुढील 10 ते 20 वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाहीये- बाबा रामदेव

“केवळ 40 जागांवर नितीश कुमार कसे मुख्यमंत्री बनू शकतात?”

दिवाळीनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या कोहलीच्या व्हिडीयो मेसेजवर चाहते संतापले, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More