लपवण्याची वेळ निघून गेलीय, अॅसिड हल्ल्यातील मुलीनं शेअर केला फोटो!

लंडन | चुलत भावाने केलेल्या अॅसिड हल्ल्यातून रेशम खान ही मुलगी नवा आदर्श निर्माण करतीय. या परिस्थितून बाहेर येण्यासाठी तिनं सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करायला सुरूवात केलीय.

अॅसिड हल्ल्यामुळे रेशमचा चेहरा पू्र्णपणे विद्रुप झाला होता. समाजात वावरायचं कसं?, याची तिला सारखी भिती वाटू लागली, परंतु रेशम न खचता नव्यानं उभी राहिली.

आता लपवण्याची वेळ निघून गेलीय, असा संदेश देत तिनं नुकताच एक फोटो शेअर केलाय. अनेकांचा रेशमला चांगला पाठिंबाही मिळतोय.