Top News मनोरंजन

‘अनुराग कश्यपला अटक करा’; कंगणा राणावतची मागणी

मुंबई | पायल घोषने केलेल्या आरोपांमुळे दिग्दर्शक अनुराग कश्यप चर्चेत आला होता. अभिनेत्री पायलने अनुरागवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यामध्ये आता अभिनेत्री कंगणा राणावतने देखील उडी घेतली आहे.

अभिनेत्री कंगणा राणावतने पायलच्या समर्थनासाठी पुढाकार घेतला आहे. शिवाय या प्रकरणी अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणीही कंगणाने केली आहे. पायलने केलेलं ट्विट रिट्विट करत कंगणाने अनुरागला अटकेची मागणी केली आहे.

कंगणा तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “पायल घोष जे दावे करतेय त्याप्रमाणे अनुराग कश्यप वागू शकतो शिवाय तो सक्षम आहे. त्याने आपल्या अनेक पार्टनर्सची फसवणूक केली आहे. स्ट्रगल करणाऱ्या इंडस्ट्रीतील बाहेरील मुलींना सेक्स वर्करप्रमाणे वागणूक दिली जाते.”

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री पायल घोषने अनुराग कश्यपवर गंभीर आरोप केले होते. “अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं आहे. शिवाय त्याने मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिलीये. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा.” अशी मागणी पायलने केली होती.

महत्वाच्या बातम्या-

मोदीजी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवतायेत, पण…- राहुल गांधी

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सिरीयस मॅन’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

पोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही- अनिल देशमुख

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न!

पुढच्या 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या