मनोरंजन

3 अनाथ मुलांच्या मदतीला सोनू सूद धावला, घेतली त्यांची सगळी जबाबदारी!

हैदराबाद | तेलंगणामधील यादाद्री – भुवनगिरी जिल्ह्यातील तीन मुलांचे आई-वडील हरवले होते. राज्यातील एका मंत्र्याने यासाठी पुढाकार घेतला आणि अभिनेता सोनू सूद या मुलांच्या मदतीसाठी धावून गेले.

एका व्यक्तीने ट्विटरवर सोनू सूद यांना टॅग करून या तीन अनाथ मुलांची माहिती दिली. या तीन मुलांचे आई-वडील हरवले आहे, त्यांना कोणी मोठा भाऊ किंवा सांभाळणारा वडीलधारी व्यक्ती नाही. यांना कृपया मदत करा. यावर हे तीन मुले आता अनाथ नाही, त्यांची सर्व जबाबदारी मी घेत आहे, असा रिप्लाय सोनू सूद यांनी केला.

संबंधित तीन मुलांच्या वडिलांचा मृत्यू आधीच झालेला आहे आणि आता थोड्याच दिवसांपूर्वी आईचाही मृत्यू झालेला आहे. त्यांची आजी खूपच वयस्कर आहे. याच दरम्यान सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीचे राज्य मंत्री एराबेली दयाकर राव यांनी तेलगू चित्रपट समूहाचे प्रमुख दिल राजू यांना याविषयीची माहिती दिली होती. त्यांनी या मुलांना दत्तक घेण्याचीही विनंती केली होती.

काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांमध्ये एक चित्रफीत बरीच व्हायरल झाली होती. ही चित्रफीत आंध्रप्रदेशमधील एका शेतकऱ्यासंदर्भात होती. सोनू सूदने हे पाहिल्यावर त्यांना एक बैल जोडी देण्याचे सांगितले होते, पण त्याने त्याऐवजी एक ट्रॅक्टर दिला होता. यामुळे त्याचे सर्वच स्तरावरून कौतुक झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाच्या संकटात पुण्यातील गणेशोत्सव मंडळाकडून समाजापुढे नवा आदर्श, घेतला महत्त्वाचा निर्णय!

तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, राजेश टोपेंचं भावनिक ट्विट

बारामतीत कोरोनाने हातपाय पसरले, अजित पवार ‘अ‌ॅक्शन मोड’मध्ये!

आरोग्यमंत्र्यांचा ‘उर्जास्त्रोत’ काळाच्या पडद्याआड, मुख्यमंत्र्यांना तीव्र दु:ख

राजेशभैय्या सारखा सुपुत्र महाराष्ट्राला देणाऱ्या शारदाताई आपल्यातून गेल्या, सुप्रिया सुळे हळहळल्या

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या