बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशमुखांवरील कारवाई न्यायालयाच्या निर्देशानुसार, संजय राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत आहेत”

नागपूर | शंभर कोटीच्या वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या घरी आज ईडीने छापेमारी केली आहे. यावरून विरोधी पक्ष आणि राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणावरून केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.

त्यांच्या या आरोपाला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेली कारवाई ही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सुरु आहे. या कारवाईचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

संजय राऊतांनी सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का? असा सवाल केला होता. त्याचबरोबर सीबीआय तपास करायचाच असेल तर अयोध्येच्या महापौरांनी अयोध्या मंदिर ट्रस्टसोबत जो व्यवहार केला, त्या प्रकरणाचा तपास करा. ती केस सीबीआयसाठी फिट असल्याचंही राऊत यांनी म्हटलं होतं. यावर संजय राऊत यांना एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसनं सुपारी दिली आहे आणि ती सुपारी वाजवण्याचं काम ते करत आहे, असं म्हणत फडणवीसांनी राऊतांना टोला लगावला आहे.

दरम्यान, अयोध्येच्या संदर्भात त्यांचं काही योगदान आहे का?, अयोध्येचा लढा लढणारे आम्ही आहोत. पण आयोध्येत  प्रभू श्रीरामाचं मंदिर बनत आहे, त्यामुळे काहींच्या पोटात दुखतंय, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.

थोडक्यात बातम्या-

सोन्या-चांदीचे भाव पुन्हा उतरले, वाचा आजचे ताजे दर

“खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत”

जवानानं धावत्या रेल्वेतून कोसळणाऱ्या प्रवाशाचे वाचवले प्राण, रेल्वेमंत्र्यांकडून कौतुकांचा वर्षाव

“करावं तसं भरावं, त्यामुळे राष्ट्रवादीने ईडीच्या कारवाईवर राजकारण करू नये”

“केंद्र सरकार आपल्या कर्तव्यात चुकल्यामुळेच ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More