बदलीसाठी भाजपच्या मंत्र्यांची शिफारस, पोलिसांवर कारवाई होणार?

मुंबई | बदल्यांसाठी राजकीय नेत्यांची शिफारस पत्रं जोडणं काही नवीन नाही, मात्र गृह विभागाने आता याप्रकरणी कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतलाय. 42 पोलीस निरीक्षकांच्या हे प्रकरण अंगलट येणार आहे. 

बदलीसाठी राजकीय नेत्यांची शिफारस पत्रं जोडणाऱ्या या 42 पोलीस निरीक्षकांना लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेत. वरिष्ठांवर दबाव आणल्याप्रकरणी या सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. 

धक्कादायक बाब म्हणजे शिफारस पत्रं देणाऱ्यांमध्ये भाजपच्या मंत्र्यांचा सहभाग आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची शिफारस पत्रं पोलिसांनी जोडलेली आहेत.