ईडीच्या चौकशीची पिडा टळली; उद्धव ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी समोर
मुंबई | एकनाथ शिंदेच्या(Uddhav thackery) बंडापासून ते ठाकरे सरकार संपुष्टात येईपर्यंतच्या सर्व घटना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी ठरल्या. यातच आता उद्धव ठाकरेंसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना न्यायालाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
व्यवसायिक श्रीधर पाटणकर यांच्यावर मनी लाॅड्रिग (Money Laudrig) प्रकरणी कारवाई करत ईडीकडून मालमत्ता जप्त करण्यात आली होती. 84 कोटीचा घोटाळा केल्याचा संशय होता. याप्रकरणी श्रीधर पाटणकर यांच्या 11 खासगी मालमत्तेवर धाड टाकण्यात आली होती.
ईडीने धाड टाकल्यानंतर अधिक तपास आणि पुरव्यासाठी सीबीआयने तपासाला सुरूवात केली होती. मात्र आता श्रीधर पाटणकर यांच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचा रिपोर्ट सीबीआयने(CBI) कोर्टात सादर केला आहे. न्यायालयाने तो रिपोर्ट मान्य केला आहे. यामुळे श्रीधर पाटणकर यांना दिलासा मिळाला आहे.
2019 ला महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून ईडीच्या कारवाईला जोर आल्याचं पहायला मिळत आहे. मात्र आता ईडीने पाटणकरांना क्लीन चिट दिली आहे.
थोडक्यात बातम्या
शासकीय पूजेनंतर महिन्याभरात शिंदे-फडणवीसांचं सरकार कोसळणार”
2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा- देवेंद्र फडणवीस
‘उपमुख्यमंत्री होण्याची फडणवीसांची इच्छा नव्हतीच पण…’; भाजप नेत्याचा मोठा खुलासा
‘भविष्यात असे प्रकार…’; टेबलवर चढून नाचणाऱ्या आमदारांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
“…म्हणून महाराष्ट्र, सूरत, गुवाहाटी, गोवा असा प्रवास करावा लागला”
Comments are closed.