बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार का?, अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई | एसटी विलिनीकरणाचा तिढा सुटण्याऐवजी वाढतचं चालला आहे. राज्य सरकारने अनेक प्रयत्न केल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही. त्यातचं काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी एसटीचं विलिनीकरण शक्य नसल्याचं सांगितलं आहे. आता परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी विधानपरिषदेत एसटी संपावर महत्त्वाची माहिती दिली आहे.

कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांवरील कारावाई मागे घेण्यात आली आहे. मात्र सेवेतून बडतर्फ केलेल्या कामगारांवरील कारवाई मागे घेण्यात येणार नाही, असं अनिल परब यांनी विधानसभेत सांगितलं आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकातं शिंदे यांनी बडतर्फ कामगारांना परत कामावर घेणार का? असा प्रश्न विचारला होता.

शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना परब यांनी ही माहिती दिली आहे. कालच “एसटीचं विलिनीकरण कर्मचाऱ्यांनी डोक्यातून काढून टाका. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार नाही,” असं अजित पवारांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता अनिल परबांनी ही माहिती दिल्याने आता एसटी कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, एसटी सेवा बंद असल्याने राज्यातील जनतेचे मात्र हाल होतं आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांतील संघर्ष दिवसेंदिवस वाढतचं चालला आहे. सध्या विलिनीकरणाचा मुद्दा उच्च न्यायालयाकडे आहे. मात्र, अजित पवारांनी एसटी विलनीकरण डोक्यातून काढून टाका, असं सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

भारतीयांची चिंता मिटली! Omicronबाबत दिलासादायक माहिती समोर

“पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत का? महाराष्ट्राचा बंगाल होऊ देऊ नका”

‘…तो कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’, विधानसभेत पुन्हा एकदा राडा

इतका अभ्यास बरा नाही, त्याचं ओझं राज्यपालांना झेपलं पाहिजे- संजय राऊत

“…तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More