Top News महाराष्ट्र सातारा

साताऱ्यात ‘दंगल’… बारकाल्या पोरींची कॉलेजमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ-

सातारा | हल्ली समाजात युवा तरुणांमध्ये अनेक भांडणं होत असतात. काही भांडणं हाणामारी पर्यंतही जातात. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एका कॉलेज तरुणीने फायटींग केली असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळं परिसरात चर्चांना उधाण आलं आहे.

साताऱ्यातील प्रतिष्ठित यंशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थिनींमध्ये राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ संपूर्ण राज्यभरात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोन तरुणींमध्ये हाणामारी झाली असल्याचं स्पष्ट दिसत आहे.  एक मुलगी दुसऱ्या मुलीला तिच्या केसांना धरुन मारत आहे, तर मार खाणारी मुलगी पायऱ्यांवर पडलेली आहे. हा सगळा प्रकार कॉलेजच्या कॅम्पसमध्ये घडला असल्याचं व्हिडिओमधून समजत आहे.

या सगळा प्रकार थांबवण्यासाठी पोलिस घटनास्थळी गेले आणि यासंदर्भात काही विद्यार्थिनींना ताब्यात देखील घेतलं असल्याचं समजत आहे. ताब्यात घेतलेल्या विद्यार्थिनींच्या आई वडिलांना पोलिस ठाण्यात बोलवलं आहे. तसंच मारहाण करणाऱ्या विद्यार्थिनीवर कलम 107 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा प्रकार घडत असताना काही विद्यार्थिनींनी फोनमध्ये घटनेचा व्हिडिओ शूट केला. काहींनी तो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरही ठेवला. त्यामुळं हा सर्व प्रकार उघडकीस आला असल्याचं समजत आहे. तसंच पोलिस या प्रकरणाचा आणखी तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात धक्कादायक ऑडिओ क्लिप्स व्हायरल

एक नवरा, एक प्रियकर… आणखीही अनेकांसोबत संबंध, शेवट काळजाचा थरकाप उडवणारा

ती पुन्हा येतेय… जावा पुन्हा लॉन्च करतेय आपली खतरनाक बाईक!

‘हा’ आईपीओ मंगळवारी बाजारात धडकणार; गुंतवणुकदांरांसाठी मोठी संधी

अक्षय कुमारचं टेन्शन वाढलं, ‘अशा’प्रकारे बसू शकतो मोठा फटका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या