बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अशा’ लोकांवर जबरदस्त दंड ठोठवायला हवा- मकरंद अनासपुरे

मुंबई | आपल्या आजुबाजूच्या परिसरात वावरताना काही नागरिक प्रवास करताना वाहतुकीचे नियम तोडताना दिसतात. कोरोनापासून बचावासाठी सरकारने मास्क वापरण्यास सांगितलं आहे. मात्र ते काहीजण वापरताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर बोलताना मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वाहतुकीला शिस्त आणि अपघातांवर प्रभावी नियंत्रण ठेवायचं असेल तर कठोर कायद्यांचा बडगाही उगारावा. नियम अटी या सगळ्या आपल्याच सुरक्षेसाठी आहेत हे माहिती असूनही काही लोक अगदी बेशिस्तसारखे वागतात. विना हेल्मेट घालणा-यांवर तर जबर दंड ठोठायला हवा. जबाबदारीने वागणं आपलं कर्तव्य असल्याचं मकरंद अनासपुरे यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या काळात आपण मास्क लावायला आणि सॅनिटायझर वापरायला शिकलो. तसं वाहन चालवताना सर्वांनी हेल्मेट घालायला शिका, असा सल्ला अनापुरेंनी दिला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन विभाग, संसद सदस्य रस्ता सुरक्षा समिती यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मकरंद अनासपुरे बोलत होते.

महानगरांसोबत रस्तेही विस्तारले आहेत मात्र त्यावर असंख्य खड्डे असतात. खड्डे चुकवताना आजवर अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अशा अपघातांमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. आपल्या सुरक्षेची काळजी आणि अपघाताची जबाबदारी घ्यायला कुणीही पुढे येणार नाही. ही खबरदारी आपल्यालाच घ्यायची असल्याचंही अनासपुरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

पूजा चव्हाण प्रकरणावर अनिल देशमुखांनी सोडलं मौन, म्हणाले…

व्हाॅट्स अॅप आणि फेसबुकला सुप्रिम कोर्टाचा धक्का

…नाहीतर शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

21 वर्षीय दिशाला का केली अटक?; नेमके काय आहे टूलकिट प्रकरण?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे ‘या’ आमदाराला येत आहेत धमक्यांचे फोन!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More