बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई होणार?

मुंबई | ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी चालू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला. सरकारी कामात हस्तक्षेप असून वर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असं म्हणत राज्याचे गृहमंत्रीदिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीस- दरेकर यांच्यावर कारवाई होण्याबाबतचे संकेत दिले.

राज्यात 50 हजार रेमडेसिवीरचा साठा येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुरवठादाराकडे लसीचा पुरवठा करण्याचं पत्रं असल्याचं पोलिसांना माहीत नव्हतं. सुरुवातीला पुरवठादाराने ते पत्रं दाखवलंही नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र ही चौकशी सुरू असताना फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे काही सहकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात गेले.

देवेंद्र फडणवीसांनी पोेलिसांवर दबाव टाकला.शासकीय कामात हस्तक्षेप करण्यात आला. त्यामुळे चौकशीत बाधा आली आहे. या गोष्टी योग्य नाहीत आणि पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाही, असा इशाराही वळसे-पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, एफडीएने लसीचा पुरवठा करण्याची विनंती ब्रुकच्या मालकाला केली होती. त्यावर त्याने असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे हा साठा कुणाकडे जाणार होता, याची चौकशी करण्यात येणार असल्याचं वळसे पाटलांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

“जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”

कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये?, अत्यंत महत्त्वाची माहिती

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला दिले हे 5 सल्ले

“100 कोटीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्यांना माफी नाही”

सुपर कोहलीचा राहुल त्रिपाठीने घेतला अफलातून झेल, पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More