बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सुरक्षेत चुक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करणार”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्या घरावर संतप्त एसची कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानं सर्वत्र खळबळ माजली आहे. मुंबई पोलिसांना हल्ल्याबाबत कुठलीही कल्पना नव्हती का?, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. अशातच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (HM Dilip Walse Patil) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत ठाकरेंनी गृहखात्याच्या बेजबाबदारपणावर बोट ठेवलं आहे. परिणामी लवकरात लवकर चौकशी अहवाल सादर करून चुक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत वळसे पाटील यांनी दिले आहेत.

वळसे पाटील यांनी दिवसभरात ठाकरे आणि पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक केली. त्यानंतर त्यांनी सुरक्षेत त्रुटी राहिल्याचं मान्य केलं आहे. सुरक्षेतील त्रुटीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे चौकशी करणार आहेत. परिणामी राज्यात अशाप्रकारची घटना परत होवू नये म्हणून पोलीस काळजी घेत आहेत.

दरम्यान, राज्य पोलीस दलात समन्वय नसल्याची टीका आता विरोधक करत आहेत. शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामुळं मुंबई पोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे निघत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी

“शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागं संजय राऊतांचा हात”

“एवढं काम करतोय की काम करून करून…”; अजित पवारांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा

“पवार कुटुंबानं महाराष्ट्राला विकत घेतलं आहे का?”; निलेश राणेंचा खोचक सवाल

“…तर धोनीच्या संघाचं काही खरं नाही”; दिग्गज क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More