स्टिंग ऑपरेशन प्रकरणी अर्णब गोस्वामीविरोधात तक्रार दाखल

स्टिंग ऑपरेशन प्रकरणी अर्णब गोस्वामीविरोधात तक्रार दाखल

नवी दिल्ली | अणुऊर्जी विरोधी कार्यकर्ते डॉ. एस. पी. उदयकुमार यांनी अर्णब गोस्वामी, रिपब्लिक वृत्तवाहिनी आणि त्यांच्या दोन पत्रकारांविरोधात तक्रार केलीय. प्रेस काऊंसिल ऑफ इंडियाकडे ही तक्रार करण्यात आलीय. 

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलन चालवण्यासाठी उदयकुमार यांना परदेशातून निधी येत असल्याचं स्टिंग ऑपरेशन रिपब्लिकनं केलं होतं.

दरम्यान, हे स्टिंग ऑपरेशन धादांत खोटं असून रिपब्लिक आणि त्यांच्या पत्रकारांकडून आपल्याला त्रास सुरु असल्याचा आरोप उदयकुमार यांनी केलाय.

Google+ Linkedin