जळगाव महाराष्ट्र

भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ!

जळगाव | जळगाव येथे शुक्रवारी रात्री भाजपच्या स्थानिक कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी येत पाहणी केली. सोशल मीडियावर यासंदर्भातील एक क्लीप व्हायरल होत आहे. तर दगड भिरकावणारी व्यक्ती भाजप कार्यकर्ता नसून मनोरुग्ण असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे.

या प्रकरणी पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती़.पोलीस भाजप कार्यालयात जाऊन आले. मात्र, याबाबत कुठलाही गुन्हा दाखल किंवा नोंद करण्यात आलेली नाही.

बैठक संपल्यानंतर काही पदाधिकारी बाहेर येत असताना संबंधित व्यक्ती दरवाजातच लोळत होता. मात्र तो मनोरुग्ण असल्याचं सांगत काही अन्य कार्यकर्त्यांनी त्याला बाजूला नेलं. त्यानंतर गिरीश महाजन यांना शिवीगाळ करून गाडीकडे एक दगड फेकल्याची माहिती एका ऑडिओ क्लिपमधून समोर आली आहे़.

महत्वाच्या बातम्या-

“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”

‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर

जेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन

“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नय

‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या