बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपसोबत आण्णांचे चांगले संबंध होते, तरीही त्यांनी परंपरा पाळली नाही”

कोल्हापूर | महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत जोरदार टक्कर झाली. काॅंग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीवरून राज्यात राजकारण तापलं होतं. निकालानंतर आता सर्वस्तरातून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करत मतदारसंघ राखण्यात यश मिळवलं आहे. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपली भावना मोकळी केली आहे.

चंद्रकांत जाधव यांचे निष्ठावंत कार्यकर्ते अनिल वरकट यांनी आपल्या भावना मोकळ्या करताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. आण्णा फार लोकप्रिय होते, आण्णांची कार्यपद्धती फार चांगली होती म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती. भाजपसोबत आण्णांचे चांगले संबंध होते, ही निवडणूक लागायला नको होती, भाजपने परंपरा पाळली नाही, असंही वरकट म्हणाले आहेत.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपकडून प्रखर हिंदूत्वाच्या मुद्द्यावर जोर देण्यात आला होता. जयश्री जाधव यांनी भाजपच्या सत्यजीत कदमांना तब्बल 19 हजार मतांच्या फरकानं पराभूत केलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘सिल्वर ओक’ हल्ला प्रकरणातील पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड!

“अंगावर शाॅल टाकली म्हणून कुणी बाळासाहेब होत नाही”

IPL 2022: CSKला मोठा धक्का! धडाधड गडी टिपणारा ‘हा’ स्टार गोलंदाज संघाबाहेर

“राज ठाकरे हे मराठी ओवैसी, ते फक्त हिंदूंना भडकवतात”

मोठी बातमी! जयश्री पाटलांना शोधण्यासाठी मुंबई पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More