Top News मनोरंजन

वरूण धवन आणि क्रिती सेनॉननंतर ‘या’ अभिनेत्रीला कोरोनाची लागण

मुंबई | नुकतंच अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर अजून एका प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय.

अभिनेत्री नीतू कपूर यांचा देखील कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. नीतू कपूर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

त्यांच्या ट्विटमध्ये नीतू कपूर म्हणतात, “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आलीये, त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलंय. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी औषधं घेत असून स्वत:ची काळजीही घेतेय. सगळ्यांनी स्वत:ची काळजी घ्या आणि मास्क वापरा.”

‘जुग जुग जियो’ या चित्रपटाच्या माध्यमातून नीतू कपूर रुपेरी पडद्यावर झळकणारेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत वरुण धवन, कियारा आडवाणी आणि प्राजक्ता कोळी दिसणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवरच्या खटल्याला कोर्टाकडून ‘तारीख पे तारीख’; या तारखेला होणार सुनावणी

‘बायकोने बजावलंय मेव्हण्याच्या लग्नाला आला नाहीत तर…’; सुट्टीसाठी पोलिसाने केला अनोखा अर्ज

‘…तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या’; भाजपचं राष्ट्रवादीला आव्हान

…म्हणून रानगव्याचा मृत्यू झाला; वनविभागातील अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

….म्हणून अमेरिकेत लोकांना कोरोना झाला हे बरं झालं- डोनाल्ड ट्रम्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या