अभिनेता महेश बाबूनंतर अल्लू अर्जुनचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…
मुंबई । साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन त्याच्या पुष्पा या चित्रपटासाठी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. “पुष्पा” चित्रपटातील गाण्याने आणि त्याच्या अभिनयाने तो लाखो दिलाची धडकन बनलाय.
आज सुद्धा त्याच्या अभिनयाने त्याचे फॅन वाढत चाललेत. माध्यमांशी बोलत असताना अल्लू म्हणाला मी आता बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा विचार करत आहे.
बॉलिवूडमध्ये काम करणं माझ्यासाठी खूप मोठं टास्क नाही, परंतु संधी मिळताच मी माझं सगळं कौशल्य बोलिवडूमध्ये देईल, असं वक्तव्य अभिनेता अल्लू अर्जुनने केलं. पुढे तो असं देखील म्हणाला की, बोलिवूडमध्ये काम करणं माझ्यासाठी कंफर्ट झोनच्या बाहेर आहे. त्यामुळे जेव्हा मला गरज पडेल त्यावेळेस मी माझ्या कंफर्ट झोन मधून लवकरच बाहेर पडेल.
अल्लूने केलेल्या या वक्तव्याने असं समजतंय की त्याला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यास काही हरकत नाही. मात्र तो वाट पाहायतोय की, त्याला चांगला चान्स आणि चांगली स्क्रिप्ट कधी मिळेल याची. अल्लूच्या या बोलण्याने हे स्पष्ट झालं की, त्याच्या या निर्णयावर त्याचे चाहते नक्कीच आनंदी होणार. दरम्यान या अगोदर अभिनेता महेश बाबू म्हणाला होता की, मी कधीच साऊथ इंडस्ट्री सोडणार नाही. मला या आधी बॉलिवूडमधून खूप वेळा संधी मिळाली होती मात्र मला नाही वाटत की, ते मला तेवढं पे करू शकतील.
थोडक्यात बातम्या-
SBI च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; बँकेने घेतला महत्त्वाचा निर्णय
एसटी बस अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर!
“लग्न झाल्यानंतर तुम्ही काहीच नाही केलं तर पोरं कशी होणार”
शिवसेनेला मोठा झटका; उद्धव ठाकरेंवर आरोप करत ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा
इंदौरवरून अमळनेरला येणारी बस नर्मदा नदीत कोसळली, 13 जणांचा मृत्यू
Comments are closed.